खबरकट्टा/चंद्रपूर:
दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तींचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरुकता करणे हा या दिवसाचा मुळ उद्देश आहे.#khabarkatta chandrapur
यास्तव आज दिनांक 26 जून "जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिह परदेशी यांनी सकाळी 07:00 ते 08:00 वाजेपर्यंत गांधी चौक चंद्रपूर पासुन ते पोलीस मुख्यालय चंद्रपूर पर्यंत पोलीसांची प्रभात रैलीचे आयोजन करून "जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळण्यात येवुन सदर प्रभात रैलीचे माध्यमातुन मुख्य मार्गावर अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या संदर्भात स्लंगर, फलके, बॅनर, पोष्टर, होर्डींग द्वारे तसेच नागरीकांना पॉम्पलेट वाटुन नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सदर प्रभात रैलीचा शुभारंभ पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतील गांधी चौक चंद्रपूर येथून सकाळी 07:30 वाजता श्री विनय गौडा, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री महेश कोंडावार, पो.स्टे. चंद्रपूर शहर चे पोनि श्री सतिश राजपुत, पोस्टे रामनगर चे पोनि श्री राजेश मुळे, पोस्टे दुर्गापूर येथील पोनि श्री अनिल जिट्टावार, शहर वाहतुक शाखेचे श्री रोशन यादव, श्री प्रविण पाटील, सपोनि श्री मिलींद पारडकर सह अनेक पोलीस अधिकारी तसेच सी-60 दंगा नियंत्रण पथक, वाहतुक शाखा, पोलीस मुख्यालय आणि पोस्टे चंद्रपूर शहर रामनगर, दुर्गापूर येथील महिला व पुरुष पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर जनजागृती प्रभारी रैली शहरातील महात्मा गांधी रोड मुख्य मार्गाने जटपुरा गेट, सावरकर चौक मार्गे पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे समारोप करण्यात आला.#khabarkatta chandrapur
अंमली पदार्थ नाश कारवाई
पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती प्रभारी रैलीचे समापन झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एनडीपीएस अॅक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजा, डोडा पावडर व टरफल) असा एकुण 906 किलो 962 ग्रॉम अंमली पदार्थ हा मा. न्यायालयाचे परवानगीने पंचासमक्ष पोलीस मुख्यालय येथे जाळुन नाश करण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur
सदर अंमली पदार्थ नाश करतांना पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्रीमती राधीका फडके, परिपालीस उपअधीक्षक श्री विशाल नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री महेश कोंडावार, पो.स्टे. राजुरा, चंद्रपूर शहर रामनगर, दुर्गापूर, घुग्घुस, गडचांदूर, कोरपना, सावली चे प्रभारी अधिकारी पोनि श्री सतिश राजपुत, पोनि श्री राजेश मुळे, पोनि श्री अनिल जिट्टावार, पोनि श्री आसीफ शेख, पोनि श्री रविंद्र शिंदे, पोनि श्री सदीप एकाडे पाटील, सपोनि श्री आशीष बोरकर, शहर वाहतुक शाखेचे श्री रोशन यादव, श्री प्रविण पाटील सपोनि श्री मिलींद पारडकर सह इतर अधिकारी व अंमलदार हजर होते.#khabarkatta chandrapur

