चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर...#Grand Blood Donation Camp organized by Chandrapur District Bar Association - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर...#Grand Blood Donation Camp organized by Chandrapur District Bar Association

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय तर्फे चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनला विनंती करण्यात आले की, चंद्रपूर रक्तकेंद्र विभाग येथे रक्त साठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रूग्णांना रक्ताची खूप प्रमाणात आवश्यक असल्याचे आढळून आले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा व येथील तालुका येथील रुग्णांना रक्त मिळत नसल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणीतून जावे लागत आहे. सिकल सेलच्या अनेक रुग्णांना सुद्धा रक्ताची गरज असते.

रक्तदान केल्याने शरीराला काही नुकसान होत नाही. रक्तदान केल्याने नवीन रक्त शरीरात निर्माण होते व शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.#khabarkatta chandrapur

वकील वर्ग हा नेहमी समजाकरिता आपल्या द्वारे योगदान करीत असतो. चंद्रपूर बार दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या बारमधे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur

🗓️दिनांक. 28.06.2023

🕙वेळ. सकाळी 10 ते दुपारी 2

🏢स्थळ. चंद्रपूर जिल्हा बार ग्रंथालय, चंद्रपूर

सूचना: रक्तदान शिबिरातील संपुर्ण रक्त शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे जमा केले जाईल.


Pages