खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर :- शहरात वाघ व बिबट्या ची दहशत असतांना आता पुन्हा एक वन्य प्राणी अस्वलची दहशत निर्माण झाली आहे.#khabarkatta chandrapur
शहरातील तुकुम परीसरातील छत्रपती नगर येथील विद्या विहार कॉन्व्हेंट जवळ सकाळी फिरायला गेलेल्या प्रेमदास मारोती रामटेके यांचेवर अस्वलाने जबर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 5 वाजता घडली.#khabarkatta chandrapur
रामटेके यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.#khabarkatta chandrapur
सदर परिसर हा सतत रहदारीचा, दाट लोकवस्तीचा असून बाजूलाच विद्या विहार कॉन्व्हेंट असून शेकडो विध्यार्थी या शाळेत येणे – जाणे करतात करिता तात्काळ वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.

