मंजुषा भोसले यांची चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


मंजुषा भोसले यांची चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती.

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


अतिशय शिस्तप्रिय व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मंजूषा भोसले यांची चंद्रपूरच्या अँटी करप्शन ब्युरो च्या उपाधीक्षक पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या रडारवर भ्रष्ट अधिकारी येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान त्यांनी पदभार सांभाळताना जनतेला आवाहन केले की आपल्याला कुठलाही अधिकारी लाच मांगत असेल तर यांची माझ्याकडं तक्रार द्या मी त्वरित त्यांच्यावर कारवाई करतो.

जिल्ह्यात लाच – लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर च्या माध्यमातून अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या खऱ्या पण त्यात न्यायालयात आरोपी अधिकाऱ्यांना नेहमीच सुटका मिळाली असल्याचे बोलल्या जातेय, पण मंजुषा भोसले यांच्याकडे पदभार आल्यानंतर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.#khabarkatta 

मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपली यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे. त्यांना आता चंद्रपूर जिल्ह्याची त्यांना जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.


Pages