कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत कामगाराचा दबून मृत्यू #coal_mines_accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत कामगाराचा दबून मृत्यू #coal_mines_accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतून निघालेला ओवरबर्डनच्या मातीत दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री १:३० च्या सुमारास घडली. विनोद बर्डे (वय ४०) अस मृत्यू कामगाराचे नाव आहे. मृतक कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत ठेकेदारी मध्ये काम करत होता. दरम्यान त्याचा मृतदेह दुपारी कंपनीच्या हाती लागला असून डंपर चालकाच्या चुकीने हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.#khabarkatta

कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत ठेकेदारी मध्ये काम करणाऱ्या विनोद बर्डे याची नाईट शिफ्ट होती. त्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू होते त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे डंपर चालकाला काही अंदाज आला नाही आणि डंपर चालकाने विनोद बोर्डे याच्या अंगावर माती टाकली त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला.

आज कामगारांना ही माहिती मिळतास त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीत दबलेल्या विनोदचा मृतदेह काढण्यात आला. कर्नाटक एमटा कोळसा खाण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने कामगाराच्या नातलगाला भरपाई देण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली. कंपनीच्या परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर कर्नाटक एमटा कोळसा खाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकाला 20 लाख रुपये व नोकरी देण्यासाठी करार करण्यात आला.

कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत ज्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू आहे त्या परिसरामध्ये लाईट नसल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला. या परिसराला लागून झुडपी जंगल आहे यामध्ये पट्टेदार वाघाचे वास्तव आहे. जाडी लावण्याची अनेक कामगारांनी मागणी केली होती परंतु कंपनी प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं असल्याने कामगारांमध्ये मोठा रोष आहे.

Pages