वाघाने घेतला शेतकऱ्याचा बळी; सावरगाव येथील घटना - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


वाघाने घेतला शेतकऱ्याचा बळी; सावरगाव येथील घटना

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सावरगांव येथील ईश्वर कुंभारे या शेतकऱ्यास गौरखेडा - हेटी जंगल परीक्षेत्रात वाघाने हल्ला करून ठार केले .

सवीस्तर व्रूत्त असे आहे की , मौजा सावरगांव येथील शेतकरी ईश्वर कुंभारे वय - 45 हे आपल्या पत्नी सोबत शेतातील पऱ्ह्यातील पाणी काढण्यासाठी गेले होते .हे शेत बोडधा बीटातील वनक्षेत्रात जवळ लागुन आहे . काही अंतरावर त्यांची पत्नी कामासाठी गेली . पण दबा धरून बसलेल्या वाघाने ईश्वर कुंभारे यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले . पत्नीचे काम संपल्यावर ती पतीकडे आली तेव्हा 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली .#khabarkatta chandrapur

या घटनेची माहिती नेरीचे वनक्षेत्रसहाय्यक व्हि एन रासेकर यांना माहीत होताच तात्काळ घटनास्थळ गाठले व पुर्ण घटनेची माहिती घेतली व घटनेचा पंचनामा केला.#khabarkatta chandrapur

Pages