खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर :- मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कोलगाव येथील युवकाने मोबाईलवर मी स्वतःच्या मनाने आत्महत्या करतो, आत्महत्येचा विचार गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या मनात सुरू आहे, यात कोणाला दोषी ठरवू नये असा मजकूर शेअर करीत कीटकनाशकप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
सुनील ठक, वय 17 वर्ष, राहणार घोडपेठ, ता. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कोलगाव येथील रहिवासी असलेला साहिल शिक्षणासाठी घोडपेठ येथे मामाकडे राहत असून केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, भद्रावती येथे दहावीत शिक्षण घेत होता.
सोमवार दिनांक 10 जुलै रोजी त्याने मामाच्या घराच्या छतावर कीटकनाशक प्राशन केले त्यामुळे तो तेथेच पडून राहिला.#khabarkatta chandrapur
साहील घरी न आढळल्याने त्याच्या मामाने व नातलगांनी शोधाशोध केला परंतु कोठेही न आढळल्याने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पोलीसांनी साहिलचे मोबाईल लोकेशन तपासले असता मंगळवारी त्याच्या मामाच्या घराच्या छतावर आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तो छतावरच मृतावस्थेत आढळून आला, त्याच्याजवळ मोबाईल पडलेला होता त्यात अखेरचा मजकूर त्याने लिहिलेला होता.#khabarkatta chandrapur
भद्रावती पोलीसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदना करिता पाठविण्यात आला आहे.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

