दोन हजाराची लाच घेताना कोतवालास रंगेहात अटक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


दोन हजाराची लाच घेताना कोतवालास रंगेहात अटक

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

भोगवटदार वर्ग-2 मध्ये असलेल्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये करून देण्याच्या कामाकरीता वरिष्ठांच्या नावाने कुळमेथे, कोतवाल यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. 12 जुलै 2023 रोजी पो.स्टे. कोरपना येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.#khabarkatta chandrapur

मिळालेल्या माहितीनुसार मोजा कोरपणा येथील तक्रारदार यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे भोगवटदार वर्ग-2 मध्ये असलेल्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये करून देण्याच्या कामाकरीता वरिष्ठांच्या नावाने कोतवाल संजय कुळमेथे यांनी तक्रारदार यांचेकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची कुळमेथे यांना लाच म्हणून दोन हजार रुपये लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने कुळमेथे यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.

तक्रारीवरून दिनांक 11 जुलै 2023 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान कोरपना तालुक्यातील साजा पारडी येथील कोतवाल संजय बापुराव कुळमेथे यांनी तक्रारदार यांना वरिष्ठांच्या नावाने दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. 12 जुलै 2023 रोजी पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही पोलिसांनी केली.#khabarkatta chandrapur

सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, पो. नि. जितेंद्र गुरनुले तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे व चापोकॉ सतिश सिडाम यांनी केली. #khabarkatta chandrapur

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर पोलीस अधीक्षक, राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय नागपुर यांनी केले आहे.

Pages