चंद्रपूर येथील डॉ. संम्यक अनिल दुधे यांनी एमडीएस परिक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला...#Chandrapur Dr. Sammyak Anil Dudhe secured first rank in the country in MDS exam - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर येथील डॉ. संम्यक अनिल दुधे यांनी एमडीएस परिक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला...#Chandrapur Dr. Sammyak Anil Dudhe secured first rank in the country in MDS exam

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

केंद्र शासनाची नामांकित पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था चंदीगड येथे असून या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी प्रयत्न करतात. या नामांकित भारत सरकारच्या संस्थेत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळावा म्हणून डॉ. सम्यक अनिल दुधे यांनी भरपूर मेहनत घेऊन पी जी आय एम इ आर चंदिगड या वैद्यकीय संस्थेत अनुसूचित जाती प्रवर्गातून भारतातून प्रथम क्रमांक मिळवून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था चंदिगड येथे एमडीएस पोस्ट ग्रॅज्युएशन साठी प्रवेश मिळवला होता.

दिनांक 30 जून 2023 रोजी एमडीएस इन ओरल अँड मॅक्सिलो फेशियल सर्जरी या पदव्युत्तर पदवीचा निकाल जाहीर झाला असून गुणवत्ता यादीमध्ये डॉ.संम्यक अनिल दुधे यांनी भारतातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना मागे टाकून डॉ. संम्यक अनिल दुधे भारतातून या कठीण डिग्री मध्ये पहिला येतो आणि चंद्रपूरचे नाव देशात नेतो यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.#khabarkatta chandrapur

गेल्या पंचवीस वर्षांमध्ये महाराष्ट्राला हा बहुमान मिळवता आला नाही आणि आता 25 वर्षानंतर डॉ. संम्यक दुधे हे देशातून पहिले आल्याने महाराष्ट्र राज्याची मान उंचावली आहे. तसेच डॉ. सम्यक दुधे हा चंद्रपूर येथील रहिवासी असून या शहराचे नाव सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.

डॉ. संम्यक अनिल दुधे यांनी आपल्या यशाचे श्रेय एच.ओ.डी. विद्यारतन सर, प्राध्यापक सतनाम सर व आई-वडील, लहान भाऊ यांना देतो. डॉ. सम्यक दुधे यांनी मोठे यश मिळवले असून त्यांची पुढील वाटचाल यशस्वी व्हावी यासाठी त्यांचे हितचिंतक चंद्रपूर येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुधाकरराव खरवडे यांनी तसेच अनेक मित्र मंडळी, नातेवाईक यांनी डॉ. संम्यक दुधे यांना शुभेच्छा दिल्या आहे.#khabarkatta chandrapur

डॉ. संम्यक दुधे यांची आई सौ. वर्षा अनिल दुधे आणि वडील अनिल दुधे सेवानिवृत्त,अधीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर, गडचिरोली.यांनी मुलांनी देशात पहिला क्रमांक मिळविला याचा आम्हाला आनंद झाला असून आमच्या मुलांकडून देशातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा घेता येईल आणि यशस्वी प्रवास करता येईल असे त्यांनी सांगितले.#khabarkatta chandrapur

Pages