धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार...#Minor girl gang-raped by being taken to forest - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार...#Minor girl gang-raped by being taken to forest

Share This

खबरकट्टा/चंद्रपूर:

बल्लारपूरः- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात दोन नराधमाने एक अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.

घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर 2 नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

एक आरोपी अटकेत एक फरार

जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय 22 वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याचावर भा. द. वि. 376, 376 ब व पोस्को 4, 6 कलम लाउन बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.#khabarkatta chandrapur

Pages