अखिल भारतीय सरपंच संघटना सरसावली सरपंचच्या मदतीला.. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अखिल भारतीय सरपंच संघटना सरसावली सरपंचच्या मदतीला..

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

कोणतीही संघटना असो संघटनेतील सदस्यांवर काही संकट आले तर संघटनेच्या माध्यमातून त्या सदस्याची मदत करणे हे संघटनेचे कर्तव्य असुन संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येऊन मदत करणे गरजेचे आहे. काही संघटना याला अपवाद आहे मात्र वणी येथील सरपंच संघटना संकट समयी संघटनेतील एका सरपंच सदस्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे.#khabarkatta chandrapur

गेल्या अनेक महिन्यांपासून वणी तालुका मधील लालगुडा येथील सरपंच श्री.धनपाल चालखुरे हे दीर्घ आजाराने ग्रस्त असून नागपूर येथे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या संदर्भात सामजिक भान जपत अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद वणी यांनी संघटनेच्या माध्यमातून मीटिंग घेऊन संघटनेच्या सर्व सरपंच, उपसरपंच तथा सदस्यांनी धनपाल चालखुरे सरपंच लालगुडा हे आपल्या कुटुंबातील वक्ती असून अश्या प्रसंगी सरपंच संघटनेने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. व त्याकरिता सर्व संघटनेच्या सदस्यांनी तन मन धनाने जमेल तेवढी आर्थिक मदत करण्याचे आव्हान अध्यक्षांचे वतीने करताच अवघ्या दोन दिवसात संघटनेच्या सदस्यांनी भरभरून मदत केली आणि संघटनेचे अध्यक्ष तथा उमरी येथिल सरपंच श्री. तुकाराम माथनकर, प्रकाश बोबडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, हेमंत गौरकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वणी , निलेश पिंपळकर सरपंच सखारा, राजेंद्र इददे सदस्य गोवारी (पथरी) यांनी नागपूर येथे एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्यतीची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली व सरपंच संघटना तुमच्या पाठीशी असून कोणत्याही प्रकारची चिंता न करता कोणतीही अडचण पडल्यास आम्ही मदत करू असा आधार देण्यात आला. संकटकाळी एका सरपंचाचे मदतीला सरपंच संघटना धावुन आल्यामुळे सरपंच संघटनेचे कौतुक होत आहे.#khabarkatta chandrapur

Pages