देवदर्शनाहून परतताना काळाची झडप: भरधाव कारची कंटेनरला धडक...#While returning from Devadarshan, a time-lapse: A speeding car collides with a container - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


देवदर्शनाहून परतताना काळाची झडप: भरधाव कारची कंटेनरला धडक...#While returning from Devadarshan, a time-lapse: A speeding car collides with a container

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

रामटेक - भंडारा रोडवर एका ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शन आटोपून परत येताना हा अपघात झाला. अपघातात एक वृद्धासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. रामटेकगडहून भंडारा येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी जाताना या कुटुंबाच्या कारचा अपघाताची झाला आहे. या भीषण अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश भेंडारकर (वय 34) हे त्यांच्या कुटुंबीयांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दर्शनासाठी आले होते. रामटेक गड मंदिराचे दर्शन घेऊन ते आपल्या गावी परतत असताना रामटेक - भंडारा मार्गावरील आरोली खंडाळा गावाजवळ त्यांची कार उभ्या असलेल्या कंटेनर ट्रक क्रमांक एमएच 40 सीडी 9802 ला धडकली. या अपघातात तिघांचा करुण अंत झाला.#khabarkatta

हिमांशु भेंडारकर (8 महीने), भार्गवी बोंदरे (वय 8) आणि परसराम लहानु भेंडारकर (वय 70) असे मृतकांचे नाव आहे. तर सिताबाई परसराम भेंडारकर (वय 64), ऊन्नती राजेश भेंडारकर (वय 50), दुर्गा राजेश भेडारकर (वय 32), भाव्या चंद्रहास बेंद्रे (वय 8) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या एका बाजूचा अक्षरश: चुराडा झाला आहे.#khabarkatta

कारचालक आणि समोरच्या सीटवर बसलेली महिला जखमी होऊन कारमध्ये अडकली. अपघातातील जखमींना रामटेकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, परसराम भेंडारकर यांच्यासह दोनही चिमुकल्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमींवर नागपुरात उपचार सुरू आहेत. अरोली येथे ट्रक क्रमांक एमएच 40 सीडी 9802 च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु आहे.#khabarkatta


Pages