कौतुकास्पद : 59 व्‍या हिन्‍दी राज्‍य नाटय स्‍पर्धेत विदर्भाची बाजी चंद्रपूरचे ‘हॅलो राधा में रेहाना’ राज्‍यात प्रथम डॉ. जयश्री कापसे – गावंडे यांना दिग्‍दर्शनाचे प्रथम पारितोषीक नूतन धवने यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍यपदक, रोहिणी उईके यांना अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र नेपथ्‍य, प्रकाशयोजना, रंगभूषा, नाटयलेखनाची प्रथम पारितोषीके, एकूण 8 पारितोषीकाचे मानकरी #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


कौतुकास्पद : 59 व्‍या हिन्‍दी राज्‍य नाटय स्‍पर्धेत विदर्भाची बाजी चंद्रपूरचे ‘हॅलो राधा में रेहाना’ राज्‍यात प्रथम डॉ. जयश्री कापसे – गावंडे यांना दिग्‍दर्शनाचे प्रथम पारितोषीक नूतन धवने यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍यपदक, रोहिणी उईके यांना अभिनय गुणवत्‍ता प्रमाणपत्र नेपथ्‍य, प्रकाशयोजना, रंगभूषा, नाटयलेखनाची प्रथम पारितोषीके, एकूण 8 पारितोषीकाचे मानकरी #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


59 व्‍या महाराष्‍ट्र राज्‍य हिन्‍दी राज्‍य नाटय स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्‍थेच्‍या अजय धवने, आशिष अम्‍बाडे निर्मीत ‘हॅलो राधा में रेहाना’ या नाटकाने निर्मीतीच्‍या प्रथम पारितोषीकासह 8 पारितोषीके पटकावित राज्‍यात अव्‍वल ठरण्‍याचा बहुमान प्राप्‍त केला आहे. 


या नाटकाला निर्मीतीचे प्रथम पारितोषीक प्राप्‍त झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शनाचे प्रथम पारितोषीक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना जाहीर झाले आहे.


सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍यपदक नूतन धवने यांना तर अभिनय गुणवत्‍ता पुरस्‍कार रोहिणी उईके यांना जाहीर झाला आहे. 


सर्वोत्‍कृष्‍ट प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषीक हेमंत गुहे यांना तर सर्वोत्‍कृष्‍ट नेपथ्‍याचे प्रथम पारितोषीक पंकज नवघरे, तेजराज चिकटवार यांना जाहीर झाले आहे. सर्वोत्‍कृष्‍ट रंगभूषेचे प्रथम पारितोषीक मेघना शिंगरू, बबीता उईके यांना जाहीर झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट नाटय लेखनाचे प्रथम पारितोषीक या नाटकाचे लेखक निरंजन मार्कंडेयवार यांना जाहीर झाले आहे. या नाटकाने राज्‍यात प्रथम येत चंद्रपूरची यशोपताका पुन्‍हा एकदा राज्‍यात डौलाने फडकविली आहे.

Pages