12 जानेवारी 2008 साली अमरावती जिल्ह्यामध्ये युवा स्वाभिमान पार्टी स्थापना आमदार श्री रवी राणा यांनी केली रवी राणा यांनी गोरगरिबांच्या सेवेकरिता सातत्याने दिलेला लढा व यशस्वीरित्या प्रत्येक इलेक्शनला निवडून येऊन युवा स्वाभिमान पार्टीच्या लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले.
आज युवा स्वाभिमान पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली आहे व हळूहळू ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये देखील आपला दम खम दाखवीत आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती च्या शुभ दिनी पक्षाची स्थापना श्री रवि राणा यांनी केली व तेव्हापासून 12 जानेवारी हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात येतो.
आज 12 जानेवारी 2021 रोजी अमरावती मधील अभियंता भवन शेगाव नाका येथे युवा स्वाभिमानी पक्षाच्यावतीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला या वर्धापन दिनामध्ये युवा स्वाभिमान पार्टी तर्फे गोरगरिबांना पन्नास कटला तथा शंभर चारचाकी लॉट गाडी व महिला सशक्तिकरण करण्याकरता दोनशे शिलाई मशीन वाटप करण्यात आले, तथा मेळघाट मधील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र वीर कैलास कालोजी दहीकर यांच्या कुटुंबीयांची भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त तुला करण्यात आली तथा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या च्या कुटुंबियांना आर्थिक मदत देखील युवा स्वाभिमान पार्टी तर्फे करण्यात आली.
अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून जनतेचे हित व गोरगरिबांचे हित जोपासण्याचे काम हे युवा स्वाभिमान पार्टीकडून मोठ्या जोमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या फाटा मध्ये करण्यात आले या कार्यक्रमाला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री रवी राणा व सौ नवनीत राणा खासदार अमरावती या आवर्जून उपस्थित होत्या याशिवाय युवा स्वाभिमान पार्टी चे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते जनसामान्यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व युवा स्वाभिमान पार्टी कडून अशाच पद्धतीने जनसेवा भविष्यात देखील अपेक्षित असून ती युवा स्वाभिमानी पार्टीचे सदस्य करतील अशी अपेक्षा सामान्य जनतेने व्यक्त केली.

