अनोखे अपहरण : लग्न मोडले म्हणून चक्क मुलगी व आई चे अपहरण प्रयत्न फसला #kidnapping - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अनोखे अपहरण : लग्न मोडले म्हणून चक्क मुलगी व आई चे अपहरण प्रयत्न फसला #kidnapping

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड - 


नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाहरणि येथील मुलीचे लग्न चंद्रपूर येथील मुलाशी जुळले होते .मात्र मुलाची वर्तणूक चांगली नसल्याने लग्न तोडलेल्या मुलाने मुलीचे घर गाठून मुलीचे अपहरण करून पळून नेत असताना आईने आरड ओरड केल्याने आईसह अपहरण केल्याची तक्रार नागभिड येथे करण्यात आली. 


पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे साहेब यांनी लागलीच तपासाची चक्रे फिरविली . पोलिसांनी नाकेबंदी करण्यात आली असता मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर पोलिसांनी अपहरण करून पळून जात असलेल्या सर्वांना अटक करून नागभिड येथे आणण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही सर्व माहिती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस स्टेशन येथून सांगण्यात आले आहे.

Pages