अवैध रेती उत्खनन : जेसीबी-पोखलान जप्त - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अवैध रेती उत्खनन : जेसीबी-पोखलान जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांना प्राप्त होताच त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता रॅम्प तयार करून नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू होते जवळच लागून असलेल्या डब्लू.सी.एल.च्या मालकीच्या सर्व्हे नंबर 56 मध्ये एक जेसीबी, एक पोकलेन मशीन व अंदाजे 40 ब्रास रेती साठा आढळून आला.

या अवैध उत्खननामध्ये गुंतलेली सर्व वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून सदर वाहनांच्या मालकावर व अवैध रेतीसाठा केलेल्या संबंधितावर प्रशासनाद्वारे नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

Pages