मराठीचा अभिमान असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कुल मध्ये केला राडा. प्राचार्याला माफिनामा मागण्यास भाग पाडले.
वणी येथील प्रसिद्ध खाजगी स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कुलने यावर्षी 2023 ची दिनदर्शिका प्रकाशित केली. ती दिनदर्शिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. पण ती दिनदर्शिका ही तेलगु भाषेत असल्याने महाराष्ट्रात तेलगु भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांच्या लक्षात आले.
त्यांनी, 11 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांना घेऊन या संदर्भात शाळेच्या प्राचार्या यांची भेट घेऊन दिनदर्शिकेत मराठी ऐवजी तेलगु भाषेचा वापर करून मराठी भाषेचा अपमान केला.राडा केल्यामुळे शाळेच्या प्राचार्या यांनी दिलगीरी व्यक्त करून लिखीत माफीनामा लिहून दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष शिवराज पेचे शहर अध्यक्ष लक्की सोमकुंवर रुग्णसेवा उपाध्यक्ष, सुरज काकडे पवन दुर्ग महेश कायतवार श्रीकांत नुगुरवर. सूरज गुम्मुलावर निखिल जांगीलवर. कपिल मेश्राम. साबीर शेख. बंडू चिकराम. कार्तिक अलचेवर. शुभम बासावार. अखिल नगरकर जीवन गुममुलावर. सनी बिस्वास. गजानन कोडपे. पवन राजूरकर निखिल सुरपम. बाळू पेंदोर. इर्शाद शेख. शिवम टेकाम. विनोद सुरापाम. राहुल सर्वर अशोक शर्लावार ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

