खबरकट्टा/चंद्रपूर:
नागपूर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासींमधील विविध रोगांवरील संशोधनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'ब्लॉसम' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 'लिव्हर अँड लाईफ स्टाईल्स डिसीज'वर अभ्यास केला जाणार आहे.
या संशोधन कार्याचा प्रारंभप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, उपक्रमाचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, ट्रायबल हेल्थ रिसर्चर डॉ. दिलीप गोडे, आदी उपस्थित होते.
