नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक:एकमेकांना शुभेच्छा देत गाणार-अडबाले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक:एकमेकांना शुभेच्छा देत गाणार-अडबाले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्यातच लढत असल्याचे चित्र आहे. आज एकमेकांना शुभेच्छा देत नागो गाणार, सुधाकर अडबाले यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

सोमवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात झाली. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर नागपूरसह अन्य चार जिल्ह्यांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

शिक्षणात राजकारण नको

नागपुरातील मोहता विज्ञान महाविद्यालय केंद्रावर नागो गाणार आणि सुधाकर अडबाले एकमेकांसमोर आले असता दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नागो गाणार म्हणाले, शिक्षणात राजकारण नसले पाहिजे. आणि राजकारणात शिक्षण असलेच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद काम करते. निवडणूक असल्यामुळे आम्ही उमेदवार म्हणून उभे आहोत. विधान परिषदेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय मतदार घेईल असे सांगतानाच आपणच विजयी होऊ असा विश्वास नागो गाणार यांनी व्यक्त केला.

मला विजयाची खात्री

सुधाकर अडबाले म्हणाले, यांनी आपली लढाई वैयक्तिक नसून वैचारिक असल्याचे त्यांनी सांगितले. गाणार आणि मी पूर्वीपासून चांगले मित्र आहोत. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत. परंतु ही निवडणूक असल्याने आम्ही आमनेसामने आहोत. शिक्षकांच्या विविध संघटना माझ्या सोबत आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन या संघटनेचाही पाठींबा आहे. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, असे अडबाले यांनी सांगितले.

असे आहेत उमेदवार

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यातील २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी), प्रा. दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी), डॉ. देवेंद्र वानखडे (आम आदमी), राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष (युनायटेड), अजय भोयर, सतीश इटकेलवार, बाबाराव उरकुडे (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), रविंद्र डोंगरदेव (अपक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत), निमा रंगारी (बहुजन समाज), नरेंद्र पिपरे (अपक्ष), प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष), इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष), राजेंद्र बागडे (अपक्ष), डॉ. विनोद राऊत (अपक्ष), उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष), श्रीधर साळवे (अपक्ष), प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष) आणि संजय रंगारी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Pages