आ. जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


आ. जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये विविध उद्योजकांसमवेत चंद्रपूरसाठी 20 हजार 600 कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला.

बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. यानिमित्त चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट गुंतवणूकीबाबाबत शुभेच्छा दिल्या व संक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ देऊन तोंड गोड केले.

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राशी सुमारे 88 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीच जवळपास 22 हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भासह राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.


दरम्यान मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतल्यानंतर आमदार जोरगेवारांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना तिळगूळ देऊन - गोड गोड बोला, असे म्हणत या उद्योगांसह रिफायनरी प्रकल्पसुद्धा चंद्रपूरला द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Pages