खळबळ : वेकोली अधिकाऱ्याची आत्महत्या :हनुमान मंदिरात गळफास : सीबीआय धाडीमुळे होते तनावात - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


खळबळ : वेकोली अधिकाऱ्याची आत्महत्या :हनुमान मंदिरात गळफास : सीबीआय धाडीमुळे होते तनावात

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर वेकोली क्षेत्रातील डीआरसि -3 खाणीतील व्यवस्थापकाची वेकोली मुख्य महाव्यवस्थापक यांच्या कार्यालय समोरील हनुमान मंदिरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

या घटनेने वेकोलीत खळबळ उडाली आहे, दिनेश कराडे (48) असे मृतक अधिकाऱ्यांचे नाव असून तो वेकोली मध्ये व्यवस्थापक या पदावर होते. मात्र 14 ऑक्टोम्बर 2022 ला सीबीआय ने 5 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक केली होती. सीबीआय कारवाई झाल्यानंतर कराळे हे मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मृतक कराळे यांच्या खिश्यात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये सीबीआय च्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत फिर्यादीने कराळे यांना चुकीच्या पद्धतीने फसविले असल्याची नोंद नोट मध्ये केली असल्याची माहिती पुढे आली आहे.



कराळे यांच्यावर बुधवार ची ड्युटी मिळावी यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्याचा आरोप होता. या आरोपाखाली ते मागील 3 महिन्यापासून त्यांना निलंबित करण्यात आले होते.. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे करीत आहेत.

Pages