अधिष्ठातांचे दुर्लक्ष; लोकप्रतिनिधींच्या पत्राला दाखविली केराची टोपली प्रवेशद्वार बंदचा रुग्णांना फटका - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अधिष्ठातांचे दुर्लक्ष; लोकप्रतिनिधींच्या पत्राला दाखविली केराची टोपली प्रवेशद्वार बंदचा रुग्णांना फटका

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवेचा लाभ मिळावा म्हणून चंद्रपूर जिल्हास्थानी जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या मागील भागास म्हणजेच कस्तुरबा गांधी मार्गावर एक प्रवेशद्वार आहे.

परंतु, मागील अनेक वर्षांपासून हे द्वार बंद करण्यात आले आहे. सदर प्रवेशद्वार बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माजी नगरसेवक बलराम डोडाणी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे प्रवेशद्वार सुरू करण्याची मागणी केली. परंतु, त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागील पवेशद्वार सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदन सादर केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनीसुद्धा अधिष्ठाता यांच्याकडे पत्र पाठवून प्रवेशद्वार सुरू करण्याच्या सूचना केल्या. परंतु, रुग्णालय प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर प्रवेशद्वार सुरू केल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. • बलराम डोडाणी, माजी नगरसेवक, चंद्रपूर

शहराची मुख्य बाजारपेठ या दोन मार्गावर असल्याने वाहनांची मोठी वर्दळ याचे असते. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यारुग्णवाहिका आणि अन्य वाहनांना दूर अंतरावरून फेरा मारत यावे लागत आहे. अशात राजकीय पक्षांचे मोर्चे, विविध समाजाच्या मिरवणुका याच मार्गाने निघत असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होवून रुग्ण घेऊन येणाऱ्या वाहनांना रुग्णालयात पोहचण्यासाठी विलंब होत आहे.


त्यामुळे माजी नगरसेवक बलराम डोडानी यांनी रुग्णालयाचे मागील प्रवेशद्वार सुरू करण्याची मागणी आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे निवेदनातून केली. त्यानंतर या सर्व लोकप्रतिनिधींनी गंभीर विषय लक्षात घेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र देत प्रवेशद्वार सुरू करण्याची सूचना केली. परंतु, अधिष्ठातांच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Pages