वर्धा नदी पुलावर गंभीर अपघात - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


वर्धा नदी पुलावर गंभीर अपघात

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर :

वणी तालुक्यातील नायगाव येथून घुग्घूस येथे दुचाकीने पत्ती -पत्नी दोन लहान मुलासह येत असताना दुचाकीने वर्धा नदीच्या बेलोरा पुलाजवळी ल हनुमान मंदिर जवळ उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिली यात वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना काल शुक्रवारच्या रात्री 7.30 वाजता दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार गणेश मडावी यांच्या घराचे बांधकाम वणी तालुक्यातील नायगाव येथे सुरु असल्याने रोज ते घुग्घूस येथून नायगाव जाणे येणे करीत असतात.काल शुक्रवारला नायगाव येथून घुग्घूस येथे दुचाकी क्रमांक एम एच 34/ए 5421 वाहनाने पती, पत्नी व दोन मुलांना घेऊन येत असताना सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान वर्धा नदीच्या बेलोरा पुला जवळ असलेल्या हनुमान मंदिर जवळ उभा असलेला ट्रक क्रमांक एम. एच.34/एबी 4729 या वाहनाला मागून जबर धडक दिली यात गणेश मडावी (34)वर्ष रा. घुग्घूस व त्याचा मुलगा हा जागीच ठार झाला तर गणेशची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना होताच ते घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला.
वर्धा नदीच्या बेलोरा पुलापासून किती तरी अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने जड वाहने उभे असतात. तसेच त्या ठिकाणी काळोख असल्यामुळे लहान दुचाकी वाहनाला अंधारामुळे उभे असलेले जड वाहन दिसत नाही यामुळे अपघात होत असतात. तरी या रस्त्यावरील उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दुचाकी वाहन धारक करीत आहे.

Pages