चंद्रपूर जिल्हयात नायलॉन मांझा खरेदी व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई एक लक्ष, पंच्यानव हजार, तीनशे पसतीस रुपयाची मालमत्ता जप्त - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर जिल्हयात नायलॉन मांझा खरेदी व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई एक लक्ष, पंच्यानव हजार, तीनशे पसतीस रुपयाची मालमत्ता जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे.

आगामी मकर सक्रांत सणा निमित्त पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर होवु नये तसेच नायलॉन मांजा मुळे मानवी व प्राणी जिवीतास निर्माण होणारा धोका लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्हयातील सर्व ठाणेदार तथा स्थानिक गुन्हे शाखेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्यादुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात विशेष मोहीम राबवुन मांजा विक्रीचे दुकान तपासुन लपून-छपुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, रामनगर, वरोरा, घुग्घुस, दुर्गापूर, मुल, शेगांव हद्दीत संबंधीत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने कारवाई करुन आजपावेतो एकूण १२ केसेस करण्यात येवुन एकुण १,९५,३३५/- रुपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आले असुन सदर मांजा कारवाईची मोहीम यापुढेही संपुर्ण चंद्रपूर जिल्हयात नियमित सुरु राहणार आहे.

तरी, जिल्हयातील नागरीकांनी आपले पाल्य तथा शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडुन "मी पंतग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांना वापरू देणार नाही" असा संकल्प घेवुन पालकांनी आपला पाल्य पतंग उडवितांना कोणता मांजा वापरतो आहे याकडे लक्ष ठेवण्याचे तसेच त्यांच्याकडे नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमाकांवर किंवा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधुन पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

Pages