खबरकट्टा / यवतमाळ : मारेगाव -
मारेगाव तालुक्यातील कोसारा गावा पासून काही अंतरावर वर्धा नदीच्या पुला जवळील टर्निंगवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
तेथील कार्यक्रम आटपवुन तो रात्रीच्या सुमारास स्वतःच्या गावाला बुरांडा (ख) येथे MH 29.AA5028 पॅशन प्रो या दुचकीने वापस येत असताना अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला. या अपघातात दुचाकस्वार दुचाकीसह रोडच्या कडेला असलेल्या नालित कोसळला रात्रीची वेळ असल्याने ही घटना ये- जा करणाऱ्याच्या निदर्शनास आली नाही.

