खबरकट्टा/ चंद्रपूर:
गोंडपीपरी - हेटी नांदगाव येथील पाणी पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने हेटी नांदगाव सह. सकमुर. गुजरी, चेकनंदगाव, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव पाणीपुरवठा ठप्प आहे..
सकमुसत नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने गढूळ पाण्याने तहान भागवण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. आज दि.3 शुक्रवारी गावक-यांचा उद्रेक झाला असून तेलंगणा महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक गावक-यांनी अडवून संताप व्यक्त केला आहे. तासाभरापासून आंदोलन सुरू असून कोणतेही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने आंदालन कोणते वळण घेईल याकडे वाक्यातील जनतेचे लक्ष लागले असून ग्रामपंचायत विरोधात घोषणाबाजी आंदोलक गावकरी देत आहे.
