सेवन सिस्टर हिल येथे पुन्हा मधमांश्यांचा हल्ला : 25 पर्यटक जखमी...#Bees attack again on Seven Sisters Hill, 25 tourists injured - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


सेवन सिस्टर हिल येथे पुन्हा मधमांश्यांचा हल्ला : 25 पर्यटक जखमी...#Bees attack again on Seven Sisters Hill, 25 tourists injured

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

नागभीड तालुक्यातील सेव्हन सिस्टर हिल येथे आलेल्या पर्यटकावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात 25 पर्यटक जखमी झाले आहेत. सर्व जखमी नागपूर येथील रहिवासी आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमींपैकी काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.#khabarkatta chandrapur

शंकरपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अनेक जखमी नागपुरात गेलेत. या पूर्वीही हल्ल्याचा अनेकदा घटना घडल्या आहेत.#khabarkatta chandrapur

नागपूरची टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी येथील स्थानिक लोकांशी संगनमत करून 3 ते 4 हजार रुपयात लोकांना ट्रॅकिंगसाठी नागभीडला घेऊन येथे. 8 एप्रिलला मधमाशांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर वनविभागाने येथील प्रवेश बंद केला होता. आवारात मधमाशांच्या अनेक पोळ्या असल्याचे सांगितले जाते.

2013-14 मध्ये एका घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात डोंगरावरून खाली पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच येथे आलेल्या उमरेड आणि नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी हल्ला केल्याने बेशुद्धावस्थेत वाचवण्यात आले. गडचिरोलीतील काही पर्यटकांवरही मधमाश्यांनी हल्ला केला होता.#khabarkatta chandrapur

Pages