खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्हातील सर्व "जिल्हा-परिषद प्राथमिक" स्कूलमध्ये नर्सरी-KG1-KG2 इंग्रजी माध्यमिक वर्ग सुरु करण्यात यावे व जिल्हा-परिषद स्कूल आणि हायस्कूल-मध्ये सी-बी-एस-सी(CBSC Pattern) अभ्यासक्रम लागू करण्यात यावे* अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस मा.शिवानीताई वड्डेटीवार यांच्या मार्फत मुख.शिक्षणाअधिकारी साहबे जिल्हा-परिषद कार्यालय चंद्रपूर ला बल्लारपूर विधानसभा सचिव यु. काँग्रेस प्रितम पाटणकर यांनी केले.#khabarkatta chandrapur
दिनांक 28/06/2023 ला विश्राम गृह चंद्रपूर इथे सध्याची वाढत असलेली मंगळ परिस्थिती लक्षात घेता आपला "हा" चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात मध्ये पुढे जाऊन प्रत्येक सामान्य गरीब घरातील मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क आहेत परंतु ज्या कुटूंबातील आर्थिक परिस्थिती सक्षम आहेत तेच कुटुंबातील मुलं खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेऊन "सी-बी-एस-सी"व अन्न उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात परंतु ग्रामीण भागा-मध्ये गरीब सामान्य कुटुंबातील आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्यामुळे त्यांच्या मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षण घेणं अशक्य होते
खाजगी शाळेत प्रवेश न घेता जिल्हा परिषद स्कूल हायस्कूल मध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात व सेमी इंग्लिश किंवा मराठी माध्यमिक शिक्षण प्राप्त करत असतात त्या अनुषंगाने उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण त्यांना मिळत नाही म्हणून ही परिस्थिती लक्षात घेता मुख्य शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शिवाणीताई वड्डेटीवार यांच्या मार्फत प्रदेश महासचिन यु.काँग्रेस रमीजभाई शेख यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर -गाव मधील प्रितम पाटणकर (बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर)यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आले कि चंद्रपूर जिल्हामधील सर्व जिल्हापरिषद स्कूल व हायस्कूलमध्ये सी-बी-एस-सी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे तसेच प्राथमिक स्कूल मध्ये नर्सरी KG1-KG2 इंग्रजी माध्यमिक वर्ग सुरु करून गरीब सामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळेल त्यामुळे ग्रामीण भागातील सुद्धा शिक्षणास प्रगती वाटचाल प्राप्त होणार..!त्या वेळ उपस्थित विसापूर गाव मधील उमंग जुनघरे,गोवील खुणे होते.#khabarkatta chandrapur
माझा- गाव-माझी-शाळा-अभियान

