खबरकट्टा/चंद्रपूर:
विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या वडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आज माता महाकाली चे दर्शन घेऊन चंद्रपूर येथील वारकरी हे स्वामी चैतन्य महाराज यांच्या समवेत आपल्या लाडक्या विठू राया चे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असून त्यांचा सोई साठी व एकादशी चे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा महानगर भाजप च्या वतीने वारी तील वैश्वना चहा व नास्ता चे वितरण करण्यात आले व महानगरातून वारी जात असल्याने गिरनार चौक इथे स्वागत करण्यात आले.#khabarkatta chandrapur
वारीत सामील होऊन भाजपा पदाधिकाऱ्यानी फुगडी रींगन खेडून श्री चैतन्य महाराज यांना ओक्षवन करून पुढच्या प्रवासासाठी अभिवादन केले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने सांस्कृतिक मंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज भैया अहिर यांचा मार्गदर्शनात जिल्हा महानगर भाजप चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे , महानगर मंत्री सुभाष कसंगोट्टूवार, रवी गुरनुले, ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, रवी लोणकर, दिनकर सोमलकर,महिला मोर्चा मंत्री शिलाताई चव्हाण आदिसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

