खबरकट्टा/चंद्रपूर:
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील झिंगलेल्या अवस्थेत दोघांत शाब्दिक खडाजंगी होत एकाने थेट खलबत्त्याने ठेचत कोयत्याने वार केले.यात 50 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कोसारा येथे 9.30 वाजताचे दरम्यान घडल्याने खळबळ उडाली आहे.#khabarkatta chandrapur
सुभाष संभाजी पचारे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.सुभाष व मोहन देविदास पचारे(29) दोघेही रा.कोसारा हे आज सकाळ पासूनच तळीरामाच्या भूमिकेत होते. दोघेही दूरवरचे गणगोत असतांना दारूच्या नशेत झिंगुण दारूसाठीच त्यांचा शाब्दिक वाद विकोपाला गेला.#khabarkatta chandrapur
अशातच वादाचे भयाण रूपांतर होत मोहन याने बत्ता घेत सुभाष च्या डोक्यावर मारला.रक्तबंबाळ व निपचित पडलेल्या सुभाष याच्या शरीरावर मोहन याने पुन्हा कोयत्याने वार केले.या घटनेत सुभाषचा जागीच मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur
