विद्यार्थीनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक...#Torture of a student, killer teacher arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


विद्यार्थीनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक...#Torture of a student, killer teacher arrested

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


यवतमाळ : पुसद येथील वसंतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका कॉन्व्हेंटमधील शिक्षकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करुन त्याची 27 जूनपर्यंत कोठडी घेतली आहे.पुसद येथील कारला मार्गावरील एका कॉन्व्हेंटमधील शाळेतील शिक्षकाने कोविडच्या काळात व्हॉट्सअपवर ऑनलाइन शिक्षणाचा फायदा घेऊन एका मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर तिला विविध आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लैंगिक अत्याचार केले.#khabarkatta chandrapur


शिक्षकाकडून त्रास वाढल्याने मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर शिक्षकविरुद्ध वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम 376 (2) एफएन (1), 376 (3), पोक्सो 4, 6, 10 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक आदित्य ऊर्फ मंगेश शंकर वाठोरे यास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने पुसदच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.#khabarkatta chandrapur

Pages